कोकण सुपुत्र सुशांत आगरे यांच्या कडून पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई !!
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका मधील रावारी गावाचा सुपुत्र आणि भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत अतुलनीय मेहनतीच्या जोरावर जगाला आपली ताकद दाखवली आणि भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे.
श्रीलंका (कोलंबो) येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये १२ देशांच्या स्पर्धकांमध्ये ६९ किलो वजनी गटात तब्बल २२२ किलो वजन उचलून भारताच्या नावावर सुवर्ण पदक पटकावण्याची उत्तम कामगिरी केली. रावारी गावाचा अभिमान. गावच्या मातीत आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म, लांजा तालुका – रत्नागिरी जिल्हा येथील साधं आयुष्य, गावी शिक्षण पूर्ण करून मुंबईत काकांकडे राहून नोकरीसोबत पॉवरलिफ्टिंग मध्ये सातत्य ठेऊन , मेहनत आणि जिद्दीने सहभाग घेत आणि त्या मेहनतीचं फळ आज जागतिक पातळीवर सुवर्ण यशात रूपांतर. तसेच हे यश मेहनत, शिस्त, जिद्द आणि असामान्य क्षमतेचे प्रतीक आहे.
कुणबी पाऊल पडते पुढे आणि तू प्रेरणा आहेस नव्या पिढीची आणि हा सुवर्ण क्षण संपूर्ण कुणबी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाचा आहे. अशा प्रकारे कु. सुशांत सोनू आगरे यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा येत आहे.
No comments:
Post a Comment