केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न !!
मुंबई (शांताराम गुडेकर)
केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचा-यांचे पहिला स्नेहमेळावा, ठाणे पश्चिम, येथील क्लब हाऊस, दोस्ती विहार, फोखरण रोड नं 1 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अरविंद आगाशे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गोवा, मुंबई, पालघर, पुणे, विरार, आदी विभागातून अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे वडील -ए. व्ही बेंद्रे हे वयाच्या ९१ वर्षी उपस्थित होते त्यांचे कौतुक व सन्मान करण्यात आला. तसेच वय वर्षे ८१ पूर्ण केलेल्या - डी. बी वाघमारे, एस. एस नातू, नारायण पितांबरम, हेमन खिलनानी, बी. डी. माणगांवकर व आर. डी. उपाध्याय यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अभंग, चित्रपट गीते, लावणी, नृत्ये सादर करून फारच मनोरंजन करून धमाल केली.
प्रस्तावना - सोनाली भांगले, माधुरी सारंगपाणी व दीपक खोत यांनी सूत्रसंचालन व आभार अरविंद आगाशे यांनी मानले.
No comments:
Post a Comment