मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दुःखद निधन !!
उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श गृहिणी मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दिनांक १६/३/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार २५/३/२०२६ रोजी माणकेश्वर उरण येथे सकाळी ८ वाजता तर उत्तर क्रिया विधी व होम विधी शुक्रवार दिनांक २७/३/२०२६ रोजी बोरखार येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. उत्तर कार्य निमित्त गोरक्षक समाज प्रबोधनकार कीर्तनकार ह भ प कलावतीबाई शिवकर (केळवणे - पनवेल) यांचे दिनांक २७ रोजी सकाळी ९:३० वा.सुश्राव्य कीर्तन ठेवण्यात आले आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना त्या मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पाच नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. बोरखार गावचे पोलीस पाटील विनायक लक्ष्मण मोकल यांच्या त्या मातोश्री होत्या. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment