कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण, श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न !!
उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : सालाबाद प्रमाणे ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली (उरण )यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार दिनांक १८/३/२०२६ ते गुरुवार दिनांक १९/३/२०२६ रोजी श्री साईबाबांचे साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाचे महापूजा व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार व गुरुवारी दररोज काकड आरती, बाबाचे मंगल स्नान,श्री साई चरित्र पारायण, मध्यान्ह आरती, हरिपाठ, साईबाबांचे धुपारती असे विविध धार्मिक उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.दि १९/३/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या साई भंडाराचा (महाप्रसादाचा ) साई भक्तानी, भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. रात्री ९ वाजता श्री बापूजी देव कला मंच व अर्णवी आर्ट कोप्रोली उरण प्रस्तुत साई गीत, लोकगीत,कोळीगीतांचा मराठी नजराणा कार्यक्रम सादर करण्यात आले. आलेल्या प्रत्येक प्रमुख पाहुण्यांचे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील गणेश मंदिर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जनतेचा भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली व साई सेवक, ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ उरण व साई सेवक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सर्व महिला बचत गट, माऊली हरिपाठ मंडळ, सर्व क्रिकेट क्लब, बापूजी देव कला मंच, अर्णवी आर्ट, थ्री व फोर व्हीलर रिक्षा चालक-मालक संघटना कोप्रोली, ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आदी विविध संस्था,संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वच कार्यक्रमाचे सुंदर,उत्तम असे नियोजन व आयोजन केल्याने सर्वांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले
No comments:
Post a Comment