Friday, 20 March 2026

जिप सदस्या प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन !!

जिप सदस्या प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील १९८४ सालच्या शेतकरी लढ्यात सहभागी झालेले पागोटे गावचे सुपुत्र तथा हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण महादेव पाटील यांच्या समाजसेवेचा वसा घेतलेल्या पागोटे गावचे आदर्शवत सरपंच कुणाल पाटील यांच्या पत्नी तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या पागोटे येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाले.

 रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पागोटे गावालगत जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष कमळाकर पाटील, पंचायत समिती सदस्य कविता रुपेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, नवघर ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी, जसखारच्या सरपंच काशीबाई ठाकूर, पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सोनाली भोईर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पागोटेचे शिवसेना शाखाप्रमुख  महेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे समस्या,प्रश्न सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना लगेच त्वरित संपर्क साधता यावे यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मत या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांनी व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सरपंच कुणाल पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत दोघांचेही कार्य योग्य दिशेने योग्य पद्धतीने चालत असल्याचे सांगत या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनसंपर्क कार्यालय झाल्याने नागरिकांना त्वरित जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांना भेटता येणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे विविध समस्या,  प्रश्न मार्गी लागणार असल्याने जनतेने सुद्धा समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !!

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !! बातमीदार प्रतिनिधी : ता. २२, उपन...