Sunday, 22 March 2026

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !!

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !!

बातमीदार प्रतिनिधी : ता. २२, उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, क्षेत्र-१, बृहन्मुंबई अंतर्गत मा. विजय जाधव यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून BEST उपक्रम, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेतील विविध पदांवर कार्यरत ४२ महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय मूलभूत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण बांद्रा (प.) येथील BEST डेपोमध्ये आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण दररोज सकाळी ०९.०० ते सायंकाळी १७.०० या वेळेत दि. ९ ते १३ मार्च, २०२६ या कालावधीमध्ये पार पडले.

     सदर प्रशिक्षणामध्ये व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण सहाय्यक उपनियंत्रक श्री. ध. गुं. जाधव यांनी केले. त्यांना सल्लागार समितीचे सदस्य श्री. अनिल पाटील तसेच बृहन्मुंबईचे मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण श्री. रविंद्र वाडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

     प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी सर्व प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी नागरी संरक्षण दलाच्या सभासदत्वाची शपथ देऊन उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात “महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून महिलांशिवाय एकही दिवस पूर्ण होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन केले.

     हा प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पडल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता व आत्मविश्वास वाढल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

— उनिनासं, दल, क्षेत्र-१, बृहन्मुंबई.

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !!

BEST मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षणाचे ५ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी !! बातमीदार प्रतिनिधी : ता. २२, उपन...