ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले असून, या निष्कर्षामुळे त्यांचे नगरसेविका पद धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात अहमद सिद्दीकी यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली होती. सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर त्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आणि तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पुढील तपासानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख या अपात्र ठरून त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment