Tuesday, 21 April 2026

उरण परिसरात सकाळीच पावसाची दमदार एन्ट्री; ढगांच्या गडगडाटासह वरुणराजा बरसला !!

उरण परिसरात सकाळीच पावसाची दमदार एन्ट्री; ढगांच्या गडगडाटासह वरुणराजा बरसला !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
उरण शहर आणि परिसरात आज सकाळी अचानक वातावरणात बदल होऊन ढगांच्या भीषण गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वारे आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे (Humidity) हे भौगोलिक बदल झाले असून, सकाळच्या या पावसामुळे उरणकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या तापमानामुळे स्थानिक स्तरावर अभिसरण (Convective) ढग तयार होऊन पावसाचा शिडकावा झाला. लग्नाचा सीझन असल्याने सकाळच्या या पावसामुळे वरमाई आणि वरबापांची मोठी धावपळ उडाली, नियोजनात काही काळ अडथळे आले.

    IMD नुसार, पुढील २४ तास आकाश ढगाळ राहणार असून दुपारनंतरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस सध्या थांबला असला तरी हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे. लग्नसराईचे कार्यक्रम असलेल्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !! बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई स...