Tuesday, 21 April 2026

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत  उपनियंत्रक मा. श्री विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. १७ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन  प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. ०९/२०२६ आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गात एकूण ५६ RSP शिक्षक वृंद प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.

      दररोज दुपारी १.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विविध विषयांवर मानसेवी निदेशक अनुक्रमे श्री.बिमल नथवाणी, डाॅ.राहुल घाटवळ, हनुमान चौधरी व कमलेशजी श्रीवास्तव यांचेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विभागीय क्षेञरक्षक भारती देशमुख, डाॅ.किशोर आढळकर व रोहिणी गोलतकर यांचे सहकार्य लाभले. अंतिम दिवशी सहाय्यक उपनियंञक श्री. अनिल गावित व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. डाॅ.किशोर आढळकर, विभा, क्षेञरक्षक, ठाणे व उपमुख्य क्षेञरक्षक, क्षेञ-४, नवीमुंबई यांचे सहकार्याने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

     यावेळी मा. श्री विजय जाधव साहेब,  उपनियंत्रक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सभासदत्वाची शपथ देऊन त्यांना मोलाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री.संजय केळकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण दल यांनीही उपस्थित राहून प्रशिक्षणार्थ्यांना  मार्गदर्शन करुन सर्व मानसेवी निदेशकांचे अभिनंदन केले.

     हा प्रशिक्षण वर्ग आयोजनासाठी डाॅ.किशोर आढळकर यांनी समन्वय साधला. याप्रसंगी डाॅ.शिंपी, स्वामी सर व समाजसेवक माणिक पाटील सुद्धा उपस्थित होते. श्री.पाटील सरांनी खणखणीत सुञसंचालन करुन आनंदी व खेळीमेळीचे वातावरण ठेवले.  प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याने सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
     राष्ट्रगीताने  प्रशिक्षण वर्गाची सांगता करण्यांत आली.

Regards – DCCD, NMC, Thane.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !! बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई स...