लोहार समाजाच्या विकासासाठी भव्य सत्कार समारंभ; मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती !!
बातमीदार प्रतिनिधी: मुंबई, ता. २१, समस्त लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील विविध लोहार समाज संघटनांच्या सहकार्याने भव्य सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता वसंतस्मृती, भारतीय जनता पार्टी कार्यालय, दादर (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी लोहार समाजातील बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजाच्या विविध प्रश्नांबाबत ३२ मागण्यांचे निवेदन मान्यवर मंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री), मा. ना. श्री. आशीषजी शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री), मा. ना. श्री. मंगलप्रभातजी लोढा (कौशल्य विकास मंत्री) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय मा. श्री. रविंद्रजी चव्हाण (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप), मा. आ. श्री. अमितजी साटम (मुंबई प्रदेश अध्यक्ष, भाजप) व मा. सौ. निहारिकाताई खोंडले (कार्यकारिणी सदस्य, भाजप) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सत्कार समारंभाच्या निमित्ताने लोहार समाजाच्या विकासासाठी शासन पातळीवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य/ वृत्त - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment