सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.3500 सभासद शाळांना घड्याळ वाटप !!
** आंबवणे येथील वाळंज विद्यालयात सेकंडरी चे तज्ञ् संचालक मा गुलाबराव गवळे यांची भेट
आंबवणे, प्रतिनिधी :-
आमच्या कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी या शाळेत घड्याळ वाटप व सभासद भेट वस्तू वाटप करण्यात आले.
सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुबंई.. शाखा लोणावळा अंतर्गत घड्याळ वाटप साठी सोसायटी चे तज्ञ् संचालक मा गुलाबराव गवळे, कोषाध्यक्ष शिक्षक परिषद पुणे, अध्यक्ष शिक्षक परिषद पुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भटू देवरे शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
सेकंड्री स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी ही शिक्षक कर्मचारी यांच्या उज्वल गुंतवणूक व गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रराज्यातील अग्रगण्य संस्था आहे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सर्वच संचालक यांच्या मार्गदनाने वाटचाल करत असताना सभासदांचे हीत जोपसण्याचे कार्य निश्चित करत आहोत सुवर्णं महोत्सवी वर्षा निमित्त सभासद शाळांना घड्याळ भेट देत आहोत.त्या बद्दल समाधान वाटते.
आज पर्यत 3500 सभासद शाळांना भिंतीवरील घड्याळ व प्रत्येक सभासदास भेट वस्तू वाटप कार्यक्रम सुरु आहे. आपल्या शाळेस भेट देऊन आनंद झाला. निसर्ग रम्य परिसर व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य मुख्याध्यापक देवरे सरांच्या नेतृत्वात होत आहे. असे मत सोसायटी चे तज्ञ संचालक मा गुलाबराव गवळे यांनी व्यक्त केले...संजय कुलथे यांनी पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन केले. तसेच मान्यवरांचे आभार मानले.
वृत्त/प्रसिद्धी - भटू देवरे सर
No comments:
Post a Comment