जासई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!
उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
फुले शाहु आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई, नवी मुंबई यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, सकाळी जासई हायस्कुल येथे सर्व महापुरुषाच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले व नंतर सावित्रीबाई फुले नगर येथे मान्यवरांचे आगमन व स्वागत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी उरण पंचायत समिती सदस्या निर्मला नरेश घरत उपस्तिथ होत्या.या प्रसंगी रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार यांनी आपले विचार मांडले व रिपब्लिकन सेना सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या , कार्यक्रमाचे दिप प्रज्वलित करून कामगार नेते व शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत यांनी उपस्तिथ आंबेडकरी जनतेस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.आपण एकत्रित राहूनच कुठलेही कार्य पुढे नेऊ शकतो हेच त्यांनी जयंती दिनी सांगितले. तसेच कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे माजी व्हा. चेअरमेन नूरा शेख सर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजाप्रती त्याग व आपण यातून आपल्या मुलांना शिक्षण देणे हे किती गरजेचे आहे ते सांगितले. जासई ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच धिरज घरत यांनी हि शुभेच्छा दिल्या व आजही उपेक्षित वर्गासाठी आपण याच जयंती च्या मार्फत काय केले पाहिजे , जेणेकरून समाजाच्या शेवट पर्यंत मुलांना शिक्षण कसे घेता येईल यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायत सदस्य आदित्य यशवंत घरत यांनी फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण च्या जयंती ला आल्यावर प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुणी डॉक्टर तर वकील , तर शासकीय अधिकारी , अनेक मुलं घडवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे आणि आम्हाला हे चित्र दिसल्यावर खरच अभिमान वाटतो या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यश्री मुंजाजी मस्के यांनीही आपले अध्यक्षीय भाषण केले , स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि पुढे येऊन चळवळीचे काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मस्के आणि सुरज पवार यांनी केले तर अनेक विध्यार्थाने आपले विचार मांडले व काही विध्यार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेल्या गीतावर नृत्य केले सर्व मुलांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले, व कार्यक्रमाच्या शेवटी भोजन देण्यात आले , या कार्यक्रमास अनेक ठिकाणाचे, विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम फुले शाहु आंबेकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई यांच्या सर्व सभासदांनी व रमाई महिला बचत गट आणि यशोधरा महिला बचत गट यांच्या सर्व सभासद यांनी उत्तम नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमास जासई , एस सी ठाकूर कॉलनी ,फुले नगर , शिवाजीनगर , रेल्वे कॉलनी , शिर्के कॉलनी , नवघर , कोपर येथून आलेले सर्व अनुयायी उपस्थित होते
No comments:
Post a Comment