सत्तेच्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य मी बजावतो - प्रवीण पुरो.
उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मधुबन कट्ट्यावर "भोंदू बाबा "या विषयांवर झालेल्या कविसंमेलनात जीवन गौरव मूर्ती जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो या विषयावर बोलताना म्हणाले की, एका अशोक खरात या एका भोंदूने महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. त्याला कारण सरकार आहे.जे सरकार चुकीचे करीत आहे,त्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य करणं आवश्यक आहे ते मी करीत आहे.यावेळी प्रवीण पुरो यांच्यासोबत लेखक नाट्यकर्मी शरद कोरडे आणि पत्रकार नागेश कुलकर्णी यांनाही कोमसापकडून जीवन गौरव पुरस्काराने कट्ट्याचे अध्यक्ष राम म्हात्रे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी सुरेश शिंदेसर होते.सूत्रसंचालन मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख केले.
विमला उरण येथे दर महिन्याच्या १७ तारखेला कवी संमेलन आयोजित करण्यात येते. विमला तलाव येथे १२६ व्या कविसंमेलनात भोंदूबाबांच्या भोंदूगिरीवर अतिशय परखड विचारांच्या कविता सादर करण्यात आल्या. साहित्यरत्न प्रा.एल.बी. पाटील अजय शिवकर, नरेश पाटील, म.का. म्हात्रे,अनिल भोईर, कवी पुगावकर, भरत पाटील,हेमंत पाटील, रामचंद्र म्हात्रे,मारुती तांबे, भालचन्द्र म्हात्रे,ज्येष्ठ कवी मेस्त्री,नारायण धरत इत्यादी १६ कवींनी कविता सादर केल्या.
एड.राजेंद्र जैन, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, नीळवर्ण दत्ताराम, प्रकाश पाटील, राम पाटील, बाजीराव घरत इत्यादी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment