Tuesday, 7 April 2026

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त 'रामदास कोकरे' यांनी नुकताच कल्याण परिसरातील वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने वालधुनी नदीपात्रात प्रत्यक्ष उतरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

या पाहणी दरम्यान त्यांनी नदीतील विविध ठिकाणांची स्थिती बारकाईने तपासली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांना नदी प्रदूषणाबाबत सविस्तर माहिती दिली.

या दौऱ्यात वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील सिताराम उतेकर, खजिनदार श्री निशांत बबली कांबळे, तसेच श्री दीपक थोरात, श्री गणेश कांबळे, सौ. भारती अय्यर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने माननीय उपायुक्तांना नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर उपायुक्त श्री रामदास कोकरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करून शहराला पुन्हा एकदा स्वच्छ व सुंदर नदीचे वैभव मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे," असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे प्रमुख श्री. शशिकांत दायमा, सौ.रेखा अत्तरदे, श्री.सुरेश अहिरे यांनी उपायुक्तांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...