ओएनजीसीच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण !!
उरण दि १८,'(विठ्ठल ममताबादे) :
ओएनजीसी उरण आणि ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशन उरण यांच्या संयुक्त विद्यमाने ओएनजीसीच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.अतिशय मंगलमय आणि आनंदात पार पडलेल्या या सोहळ्याचं स्वरूप विलोभनीय तसेच नेत्र सुखद आणि त्यानंतरच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून झालेल्या अतिशय मधुर अशा स्वरूपाचं होतं.
सुमारे ३५ वर्षानंतर आज जुन्या पुतळ्याचं विस्थापन करून निर्माण झालेल्या जागेत पूर्वीपेक्षा सुंदर आणि पंचधातू नी युक्त अशा नवीन एका पुतळ्याला पुनर्स्थापित करण्यात आले.ओएनजीसी उरणचे प्लांट मॅनेजर अहमद सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ह्या पवित्र पुतळ्याचं अनावरण करण्यात आले.दादर येथील चैत्यभूमी मधून आलेल्या भंतेजी यांच्या माध्यमातून प्रथम पंचशील म्हणून आणि नंतर भीम स्तुती गाऊन या पुतळ्याच्या अनावरणाला सुरुवात झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांचे पंचशील याबाबत विस्तृत विवेचन भंतेजी यांच्या माध्यमातून सर्वांसमोर करण्यात आलं. भंत्यांची सुश्राव्य वाणी आणि ओएनजीसी चे सज्ञान श्रोते असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक साधकाला, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी रचलेल्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची प्रत भेट म्हणून देऊन भूषविण्यात आलं.
त्याच सोबत भीमगाथा या वाद्य वृंदाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम स्तुती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध घटनाना, नाटिकांच्या स्वरूपात आणि सुश्राव्य गाण्याच्या माध्यमातून,सादर करून उपस्थित श्रोत्यांचे मनोरंजन करण्यात आलं. रात्री साधारणपणे नऊ वाजल्यानंतर सर्व श्रोत्यांना उत्कृष्ट असे भोजन देण्यात आलं आणि त्यानंतर साधारणपणे रात्री अकरा वाजता सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर यशस्वी कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा एच आर हेड भावना आठवले मॅडम यांच्यातर्फे मांडण्यात आली होती, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता एच आर मॅनेजर गौरव पतंगे , तसेच मॅनेजर आय. आर. आयुष्यमान.अनिल कांबळे व एच आर एक्झिक्यूटिव्ह मिस.सांची गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभले. विनय ठाकूर विराज घरत यांनी देखील बहुमोल सहकार्य केले.या कार्यक्रमात ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशनचे चेअरमन विष्णू व्हटकर आणि सेक्रेटरी प्रकाश तरडे, आर व्ही पी .आयु.विश्वास लोखंडे, आयु. सर्वेद्र साकेत, जादूबीर मुरमु, आयु. आशिष कांबळे, तसेच राजेश पाटील सुशांत गायकवाड, आयु. सुपेंद्र मोहिते आयु. किरण धोत्रे अनिल होटकर ही संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय होती.ओएनजीसी उरण आणि ऑल इंडिया एस सी /एस टी एम्प्लॉईस वेलफेअर असोसिएशन उरण च्या माध्यमातून अतिशय विलोभनीय अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या, अनावरणाचा कार्यक्रम,अत्यंत आनंदात आणि शांततेत, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आणि ऑल इंडिया एस सी /एस टी एम्प्लॉईस वेलफेअर असोसिएशन चे चेअरमन विष्णु व्हटकर यांच्या समारोपाच्या भाषणाने सदर सोहळ्याची सांगता झाली.
No comments:
Post a Comment