Saturday, 25 April 2026

शिवस्फूर्ती प्रगती मंडळ, (गोविंदा पथक) तर्फे श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन !!

शिवस्फूर्ती प्रगती मंडळ, (गोविंदा पथक) तर्फे श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन !!

घाटकोपर, (केतन भोज) ::श्री साईनाथ मंदिर, रामनगर(अ), घाटकोपर(प), मुंबई-८६ येथील नावाजलेले शिवस्फूर्ती प्रगती मंडळ (गोविंदा पथक) तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा ही श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी श्री साईनाथ उत्सवानिमित्त बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गीत, संकल्पना साईरत्न श्रावण बाळा(भाऊ) तसेच संगीत संयोजक अशोक दादा वायंगणकर यांच्या सुस्वर स्वराने अवघ्या महाराष्ट्राला मुक्तकंठाने गौरवलेली साई पालखी गीते (झाले तुझे दर्शन साई) मराठी हिंदी साई पालखी भजनांचा सुस्वर साई भजन सोहळा आयोजित करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता भव्य साईपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि शेवटी शुक्रवार दि.०१ मे २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता साई अभिषेक केला जाणार असून तद्नंतर दुपारी २.३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तसेच नंतर सायंकाळी ७.०० वाजता महाप्रसाद (साई भंडारा) होणार आहे. आणि शेवटी रात्री ८.३० वाजता प्रमुख अतिथी देणगीदारांचा जाहिर सत्कार सोहळा पार पडणार आहे.अशा प्रकारे तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. 

तरी या भव्य श्री साईनाथ महोत्सवामध्ये सर्व साई भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष-हरेश धांद्रुत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !! महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित क...