Saturday, 25 April 2026

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!


समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष तथा गोवठने ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते समाधान गुरुनाथ म्हात्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवून गोरगरिबांना आधार दिला आहे.

 गोवठणे गावात गावदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषद शाळा गोवठणे येथे मुलांना शाळेचे बॅग, खाऊ शैक्षणिक साहित्य वाटप केले.गावातील दिव्यांग बांधवांचे समस्या समजून घेऊन समाधान म्हात्रे यांनी दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत केली. आवरे येथे भोलेनाथ मंदिरात भेट वस्तु दिली त्यानंतर बेलापूर येथे दहा ते बारा उद्योजकांनी  आपापल्या ऑफिसमध्ये केक कापून समाधान म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष भावना घाणेकर, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे,नगरसेविका नाहिदा ठाकूर, नगरसेविका तनिषा पाटील, नगरसेवक मंगेश कासारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चेतन म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार या सर्वांच्या उपस्थितीत केक कापून समाधान म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

 रात्री नऊ वाजता समाधान म्हात्रे यांच्या निवासस्थानी परिवार, मित्रमंडळी व गावातील ग्रामस्थांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोवठणे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच समीर म्हात्रे, प्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, शाळा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व शिक्षक वृंद ,पत्नी शलाका म्हात्रे,परिवार व गोवठणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विशेष मेहनत घेतली

No comments:

Post a Comment

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !! महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित क...