Sunday, 19 April 2026

वाघाटी ( Rusty spotted cat ) जातीच्या दुर्मिळ रानमांजराला त्याच्या अधिवासात केलं मुक्त !!

वाघाटी ( Rusty spotted cat ) जातीच्या दुर्मिळ रानमांजराला त्याच्या अधिवासात केलं मुक्त !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : जंगलतोड, वाढते शहरीकरण, आणि पशु पक्षांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण,बेकायदेशीरपणे केली जाणारी पशुपक्ष्यांची शिकार या सारख्यां बाबींमुळे निसर्गातील अनेक पशुपक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत त्यातलीच एक घटना उरण तालुक्यातील धुतूम गावाच्या हद्दीत पाहायला मिळाली. धुतूम गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद धावजी ठाकूर हे सकाळी वाॅकिंगसाठी जात असतानां त्यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी हालचाल होतांना दिसली. धुतूम हद्दीत कुण्या अज्ञात इसमाने लावलेल्या फासकित ( फासात ) वाघाटी ( Rusty spotted cat) जातीची रानमांजर अडकलेल्या अवस्थेत शरद ठाकूर यांना पाहायला मिळाली लागलीच त्यांनी सामाजिक कार्यात आणि  खास वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात अग्रेसर असणारी ज्या संस्थेच्या  माध्यमातून आज पर्यंत अनेक प्राणी-पक्षांना, वन्यजीवांना वाचविण्याचं काम करून त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त करण्याचं काम केलं अशी प्राणीमित्र संघटनां अर्थात केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि प्राणीमित्र महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर  व प्रविण कडू  यांना ह्या गोष्टीची माहिती देऊन कळविण्यात आले. ही माहिती मिळताच लागलीच राजू मुंबईकर यांच्या सोबत केअर ऑफ नेचर संस्थेची टीम घटनास्थळी जावून जागेची पाहणी करून लागलीच त्या  फासकी ( फासा) मधून त्या  वाघाटी जातीच्या  ( Rusty spotted cat) रानमांजराची अगदी सुखरूपपणे सुटका करून तिला एका लोखंडी पिंजर्‍यात आणून लागलीच राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र वनविभाग उरण वनपरिक्षेत्राचे वनपाल सुनिल महाडिक  यांना कळविण्यात आले व त्या वाघाटी जातीच्या रानमांजराला कुठलीच इजा झाली नसल्या कारणामुळे तिला  मौजे वेश्वी -  उरण येथील जंगलात वनगार्ड राजेंद्र करांडे यांच्या समक्ष त्यांच्या अधिवासात मुक्त संचार कारणासाठी सुखरूपपणे मुक्त करण्यात आली.अत्यंत लाजाळू आणि निशाचर असणारी प्रजाती ( Rusty spotted cat )मराठीत हीला  वाघाटी म्हणतात. जगातील आकाराने सर्वात लहान असणारी मांजर (रानमांजर) इंग्रजी नावाप्रमाणेच तीचं शरीर एखाद्या गंज लागलेल्या धातूच्या रंगाप्रमाणे असते ह्या रंगामुळेच ती आपल्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जाते. निशाचर आणि त्यात अत्यंत लाजाळू असल्यामुळे वाघाटीचे दर्शन सहजपणे होत नाही त्यामुळेच ही मांजर दुर्मिळ प्रजातीची मानली जातोय.

    वाघाटी जातीच्या रानमांजराला वाचण्यासाठी  उरण -धुतूम गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकूर , निकेश मढवी, कपिल घरत, प्रतिक ठाकूर, देवेंद्र ठाकूर आणि  धुतूम गावातील ग्रामस्थ सोबतच केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर,प्रविण कडू आणि काॅन संस्थेचे टीम यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्वांच्या प्रयत्नातून वाघाटी जातीच्या ह्या दुर्मिळ रानमांजराची सुखरूपपणे सुटका करून तीला तीच्या मुक्त अधिवासात ( जंगलात ) मुक्त संचार करण्यासाठी मुक्त केल्याने ह्या सर्वांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे

No comments:

Post a Comment

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या  कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!       *कल...