डोंबिवलीत महाराष्ट्र दिन, कामगार दिन उत्साहात; अवयवदान जनजागृतीला भरभरून प्रतिसाद !!
*डोंबिवली (पूर्व)*
कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने लोकवर्गणीतून महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शुक्रवार, 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता सुनील नगर येथील बहिणाबाई उद्यानात उत्साहात पार पडला.
*कार्यक्रमाची सुरुवात*
महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात सौ. सानिका गंधे, सौ. माधुरी कोरडे तसेच विद्यार्थी आयुष तावडे व मयंक शिगवण यांनी सहभाग घेतला.
*मान्यवरांची उपस्थिती*
जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष मिलिंद बिराडे, अवयवदान जनजागृतीचे कार्यकर्ते विजयसिंह परदेशी, रमेश येवले, माजी अध्यक्षा विनिता जोशी, डॉ. रमेश येवले, प्रशांत प्रधान, साक्षी शास्त्रकार, नगरसेवक मंदार टावरे, नगरसेविका अलकाताई म्हात्रे व माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. जायंट्स ग्रुपच्या 35 वर्षांच्या सामाजिक कार्याची माहिती विकास जोशी यांनी दिली. कृष्णा सोमार्डे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन प्रकाश माने यांनी तर आभार सानिका गंधे व माधुरी कोरडे यांनी मानले.
*अवयवदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद*
अवयवदान जनजागृतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अजित दामले, गणेश ठोंबरे, मेघा ठोंबरे व पलावाच्या वैशाली हिरे यांनी स्वेच्छेने अवयवदान नोंदणी अर्ज भरले.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
*यशस्वी आयोजन*
कार्यक्रमाला 125 ते 130 नागरिक उपस्थित होते. विकास जोशी, कृष्णा सोमाडे, प्रदीप पवार, शशिकांत होनमोडे, हेमंत बारस्कर, फुलचंद माली, शरद जोशी, पूजा सुपल, गीता निवळकर, सचिन वीरनोडकर यांच्यासह समितीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment