देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!
** चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम
अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित
कोकण, (शांताराम गुडेकर) :
१ मे कामगार दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या वतीने चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये लांजा येथील भाकर संस्थेच्या सुरभी वाडकर, देवरुख नगरपंचायतीत सतत दोन वेळा नगराध्यक्ष पद भुषविणाऱ्या मृणाल शेट्ये, बीएसएनएल च्या दिप्ती सावंत, शिक्षण क्षेत्रातील स्नेहल यशवंतराव यांना हिरकणी पुरस्कार, तर संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे मॅडम, संगमेश्वर पंचायत समितीचे सहायक गटशिक्षणाधिकारी विनोदकुमार शिंदे, देवरुख आयडीबीआय बॅंकेचे व्यवस्थापक प्रतिक मनवानी, सैन्यदलातील सुरेश शिंदे, चिपळूणातील शिक्षण आणि आयुर्वेदिक क्षेत्रातील जगदीश थरवळ गुरुजी यांना कार्यक्षम अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन खात्यातील कर्मचारी विजय कांबळे, एसटी कर्मचारी सुरेश धने, स्वयं फौंडेशनचे राहूल घोलम यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरस्कार स्विकारल्या नंतर पुरस्कारकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर लोकनिर्माण वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, प्रशासनातील कार्यक्षमता आणि कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.हा सन्मान सोहळा लोकमान्य वाचनालय देवरुख येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक तथा लोकनिर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कासार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दादा अनेराव, तहसीलदार अमृता साबळे, देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, युयुत्सु आर्ते तर उपस्थितांमध्ये लोकनिर्माण वृत्तपत्राचे प्रतिनिधी सत्यवान विचारे, धनंजय भांगे, संतोष शिंदे, अंकुश पोटले, रुपेश चवंडे, मैहरुन्निसा साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यकर्माचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले.
No comments:
Post a Comment