मोहोने खडकपाडा दुर्गाडी बससेवा सुरू !!
** महिला व कामगार वर्गात समाधान
कल्याण, संदीप शेंडगे : मोहने काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मोहोने – खडकपाडा – दुर्गाडी या नव्या बससेवेचा शुभारंभ मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोहोने गेट येथे महिला कामगार कार्यकर्त्यांच्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे मोहोने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ वाचून पैसाही वाचणार आहे.
मोहोने टिटवाळा ब्लॉक अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णु वाघमारे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राजेश वाघमारे हे परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून बैठका घेऊन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला या कामी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर, आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला तसेच परिवहन विभागाने साथ दिल्याने बस सेवा सुरू होऊ शकली असे वाघमारे यांनी सांगितले.
या नव्या बससेवेचा लाभ विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच दुर्गाडी देवस्थान येथे जाणाऱ्या भाविकांना होणार आहे. खडकपाडा, आधारवाडी परिसरातील महिलांना शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये पोलीस स्टेशन रुक्मिणीबाई प्रसूती गृह कॉलेज खडकपाडा पोलीस ठाणे तसेच घरकाम करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्यांना या बस सेवेचा अधिक फायदा होणार आहे. तसेच आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. दुर्गाडी किल्ला व परिसर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. असे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर यांनी सांगितले
विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा, महिलांसाठी सुरक्षित प्रवास तसेच नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचविणारी ही सेवा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोहोने परिसरातील सर्व नागरिकांनी
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी
ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ पाटील, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विष्णु वाघमारे, मोहोने ग्रामस्थ मंडळ प्रमुख सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश सोनार, विजय परियार, नाना भालेराव, संध्या ठोसर, काँग्रेसचे एस.सी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड. अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, अशोक काळपुंड, राजेश दीक्षित, वेंकटेशन, अशपाक शेख, बाळा बर्वे, विवेक घोडके, अजय रामचंद्रन, धर्मांना मेडी, उर्मिला भोईर, अश्विनी वाघमारे, सुजाता वाघमारे, दर्शना पानपाटील, मेहनाज शहा, वर्षा माने, रंजना उपदेशे, निर्मला गोडबोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश कोनकर, रमेश रोकडे, पांडुरंग वाघमारे, विजय बोरे, रोहिदास भालेराव आरपीआय पक्षाचे रमेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश नंबियार, बौद्धाचार्य गौतम मोरे, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेंडगे व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व मोहोने शहरातील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment