Sunday, 17 May 2026

कल्याण मोहने येथील एनपीएल कंपनी परिसरातील झाडे अचानक सुकल्याने खळबळ !!

कल्याण मोहने येथील एनपीएल कंपनी परिसरातील झाडे अचानक सुकल्याने खळबळ !!

कल्याण, संदीप शेंडगे : सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून समृद्धी महामार्ग असो किंवा आमदाबाद महामार्ग असो याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागत असे त्यातच कल्याणजवळ असलेल्या मोहने येथील एनपीएल कंपनीच्या आवारातील मोठ्या प्रमाणावर झाडे अचानक सुकल्याची धक्कादायक बाब समोर आली असून परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे मोठा संभ्रम आणि संताप व्यक्त केला जात आहे. 

परिसरातील अंदाजे शंभर ते दीडशे झाडे काही दिवसांतच पूर्णपणे वाळल्याचे दिसून येत असून हळूहळू या परिसरातील सर्वच झाडे जळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामागे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या प्रमाणावर निलगिरीचे झाडे अचानक सुकणे ही सामान्य बाब नसून काही ठिकाणी रासायनिक पावडर अथवा केमिकलचा वापर करून झाडे मुद्दाम सुकविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली असून परिसरातील हरित पट्ट्यावर मोठा परिणाम होत आहे. अनेक वर्षे उभी असलेली झाडे अचानक कोमेजून गेल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून झाडे सुकण्यामागील खरे कारण शोधावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल* *मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी* ...