Tuesday, 19 May 2026

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

*रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त*

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने येथील मुख्य बाजारपेठ ते स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा वाढल्याने नागरिकांसह रिक्षाचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते, फळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, भेळपुरी मोमोज आणि शोरमा विक्रेते आणि विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
या फेरीवाल्यांविरोधा रिक्षा चालक मालक असोसिएशन आंबिवली मोहने विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील आक्रमक झाले असून त्यांनी थेट पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.


विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोहने मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. हातगाड्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून रिक्षा वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

अनधिकृत फेरीवाला पथकाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचे रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. 
मोहने परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर कठोर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थी महिला व वृद्ध आणि नोकरदार वर्गांने अशा रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...