Tuesday, 5 May 2026

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) :
बेलपाडा येथील श्रावणी संतोष ठाकूर हिने रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, बोरी, उरण येथे बारावी वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक मिळविला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादन केले आहे. सोमवारी (ता. ४) तिने आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले, तिचा शाल आणि पुस्तके भेट देऊन सन्मान केला. यावेळी तिची आजी सरिता ठाकूर, संतोष ठाकूर उपस्थित होते. "शैक्षणिक क्षेत्रांत उत्तुंग भरारी घे, पुढील शिक्षणासाठी शक्य ते सहकार्य मी करणार, तू फक्त अभ्यास कर," असे महेंद्रशेठ घरत यांनी श्रावणी ठाकूर हिला आश्वासित केले.

सरिता ठाकूर यांची दुसरी नात गौरी दर्शन ठाकूर हिला महेंद्रशेठ घरत यांनी दत्तक घेतले आहे. गेली तीन वर्षे तिचा सर्व खर्च महेंद्रशेठ घरत करीत आहेत. यावेळी सरिता ठाकूर म्हणाल्या, "महेंद्रशेठ घरत यांच्यासारखा देवदूत आमच्यासोबत आहे. नाही तर मला धुणी-भांडी करून घर चालवावे लागले असते. केवळ महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही सुखाने जगतोय. माझ्या गौरीला तीन वर्षांत काहीही कमी पडले नाही. आता दुसऱ्या नातीलाही ते शिक्षणासाठी मदत करणार आहेत. त्यांचे मी आभार कसे मानू समजत नाही, परमेश्वर महेंद्रशेठ घरत यांना सतत हसतमुखानेच ठेवू दे," अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...