Sunday, 3 May 2026

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

मुंबई, प्रतिनिधी : ता. ३,
“शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते,” हा संदेश आपल्या कृतीतून देत श्रीम .मंगला पोपट ठोके यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इ 12वी परीक्षा फेब्रुवारी २०२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

बहुतेक वेळा एका विशिष्ट वयानंतर शिक्षण घेणे कठीण मानले जाते. मात्र शिक्षणाची प्रबळ आवड, काहीतरी नवीन साध्य करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मंगला ताईंनी पुन्हा पुस्तक हातात घेतले. त्यांनी शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी येथे प्रवेश घेऊन शिक्षणाचा प्रवास नव्याने सुरू केला.

घरकाम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वयानुसार येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले आणि परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यशाचे शिखर गाठले.

या यशामागे त्यांच्या पाच मुलींचा मोलाचा वाटा आहे. मुलींनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले, शिक्षकांनी अभ्यासात मार्गदर्शन केले आणि आत्मविश्वास वाढवला. कुटुंबीय व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मंगला ताईंना आपले स्वप्न पूर्ण करता आले.

मंगला ठोके यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या यशामुळे रात्रशाळांची गरज अधोरेखित झाले आहे. शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सारख्या संस्थांमुळे शिक्षणात खंड पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळत आहे.

“नोकरी, संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व अधोरेखित होते,” अशी भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

मंगला ठोके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विक्रोळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्मा. श्री बी. डी. काळे, मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“आता थांबायचं नाय,” असा जिद्दीचा संदेश देणाऱ्या मंगला ठोके आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

No comments:

Post a Comment

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !! मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच...