Sunday, 3 May 2026

प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!


प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि ३(, विठ्ठल ममताबादे) :
 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस तसा कौतुकाचा आणि आनंदाचा होता सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत असताना अकोला जिल्ह्यातील अनकवाडी या छोट्याशा गावातील कुमारी प्रियांशी आशाराम जामनेरकर या विद्यार्थिनीने मुंबईत विभागातील उरण या तालुक्यात आपली बाजी मारली आहे. उरण येथील सिटीजन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ८७.५०% गुण घेत घवघवीत यश प्राप्त करून सायन्स शाखेतून उरण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपेक्षित गुणवंत विद्यार्थिनीचे नाव कुमारी प्रियांशी आसाराम जामनेरकर असून सिटीजन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज उरण येथे शिक्षण घेऊन शिक्षक सादिक सर, शैलेंद्र प्रजापती, नरेंद्र पाटील ,प्रमोद पाटील , व साजिया मामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विवेकानंद येथील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दत्तात्रय शेळके , मयूर पाटील,आदित्य सर यांचे मार्गदर्शन घेऊन उत्तम अभ्यास करून तालुक्यातील पहिला क्रमांक पटकावला आहे. 

प्रियांशी चे वडील शेतकरी असून उरण येथे एसटी बस चालक आहेत व आईचे वडापावचे दुकान आहे.तिने दहावीपर्यंत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले. स्नितिल पडते  यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरा क्रमांक दहावीत पटकावला होता. पुढे प्रियांशीला इंजीनियरिंग करायची आहे असे तिथे ठरविले आहे. कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स या ब्रांच मध्ये  पुढचे करिअर तिला करायचे आहे. सायन्स शाखेतून प्रियांशी आशाराम जामनेरकर ही उरण तालुक्यातून प्रथम आल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...