Friday, 5 October 2018

महाराष्ट्र राज्याचे भाजपा युवा मोर्चाचे सचिव परेश गुजरे यांची मीरा-भाईंदर प्रभारी पदी नियुक्ती

टिटवाळयाचे व महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे सचिव परेश गुजरे यांची मीरा-भाईंदर प्रभारी पदी नियुक्ती
टिटवाळा  : (जैनेन्द्र सैतवाल)
               टिटवाळयातील एक युवा नेतृत्व व सतत हसतमुख, मनमिळाऊ, नम्र, मितभाषी, व भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परेश गुजरे यांची नुकतीच मीरा-भाईंदर प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या मुळे टिटवाळयातील युवा वर्गामध्ये काम करण्याचा जोश उत्पन्न झाला आहे.
              विकासाला साथ या धोरणाने प्रभावित होऊन त्यांनी भाजप मध्ये आपल्या कार्याला पूर्णपणे झोकून दिले. त्यांचा सर्वाना सोबत घेऊन, नम्रतेने सर्वांना आपलेसे करून त्यांच्या या वेगळ्या कार्य पद्धतीने त्यांनी युवा वर्ग संघटित केला. यामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा सचिव, व्हॅलेंटेअर प्रोग्रामच्या महाराष्ट्र संयोजक पद त्यांना सन्मानाने मिळाले.
           या पदांवर असताना नवीन काय करता येईल याचा ध्यास मनाशी बाळगून त्यांनी कार्य सुरू ठेवले आहे. त्यांची ही कार्यपद्धती बघून त्यांच्यावर अजून एक जबाबदारी देऊन, " मीरा-भाईंदर जिल्हा प्रभारी " म्हणून पक्षाने  परेश गुजरे यांची नियुक्ती केली आहे.
           या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...