Thursday, 4 October 2018

मुरबाड येथे प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई.

मुरबाड नगर पंचायत हद्दीत प्लास्टिक बंदी विरोधात धडक कारवाई.

३ टन अवैध प्लास्टिक जप्त,तर २५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसुल.

मुरबाड -  मंगल डोंगरे
             प्लास्टिक व प्रदूषण मुक्त महाराष्ट्र सरकारने जोरदार धडक मोहीम हाती घेतली असुन त्या अंतर्गत आज मुरबाड शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने टाकलेल्या धाडीत सुमारे ३ टन प्लास्टिक पिशव्यांचा मुद्दे माल ,पाच जणांवर कारवाई व २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
          ज्या प्लास्टिक व अविघटनशिल पदार्थांमुळे प्रदूषण पसरले जाते,पावसाळ्यात नाळे तुडुंब भरून पुर सद्रुष्य परिस्थिती निर्माण होवून त्याचा सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो,त्याचे समुळ उच्चाटन करून महाराष्ट्र सुंदर-स्वच्छ महाराष्ट्रासाठी प्लास्टिक बंदी कायदा २०१८ नुसार वापर ,साठा व विक्री करणा-यांवर कडक कारवाई साठी पथके तयार केली आहेत. हि पथके नगर पंचायत, नगर परिषद,नगर पालिका, महानगरपालिका, या क्षेत्रामध्ये कारवाई साठी जाताना साध्या वेषातील पोलीस, नगर पंचायत चे अधिकारी असा फौजफाटा सोबत घेवुन अजून १५ दिवस सदर मोहीम चालू ठेवणार आहेत.प्रथम अपराध ५०००/- ₹ दंड,दुस-यांदा सापडल्यास १००००/-₹ तिस-यांदा प्लास्टिक विक्री, अथवा साठा किंवा वापर करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई करणार असल्याचे क्षेत्रीय अधिका-याने सांगितले.आज मुरबाड येथे टाकलेल्या धाडीत क्षेत्रीय अधिकारी किरण मळभागे,डॉ. राजेंद्र राजपुत,सौ.अरुणा रोकडे,मुरबाड नगर पंचायत चे वरिष्ठ लिपीक दत्ता डोहळे हे सहभागी झाले होते.आजच्या या कारवाई मुळे मुरबाड मधील व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.तर प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध नसल्याने ग्राहक वर्गात नाराजी पसरली आहे.मात्र आपले शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा फतवा नगर पंचायतीने काढल्याने दुकानदारांसह ग्राहकांची पंचायत झाली असल्याची ओरड सुरू आहे.

No comments:

Post a Comment

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !!

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !! उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : जवाह...