हेदूटणे गाव परिसरातील घरोघरी मोफत Arsenicum Album-30 गोळ्यांचे वाटप माझी सरपंच तकदीर काळण यांचा पुढाकार!
कल्याण ( संजय कांबळे) आयुष मंत्रालय, दिल्ली यांच्या निर्देशानुसार कोविड-१९ या कोरोना विषाणू वर प्रतिबंधात्मक ऊपायाकरता Ars Album - 30* हे रोगप्रतीकारण शक्ती प्रणाली वाढवण्यास मदत करते.. सदर औषध सर्वांनाच मार्केट मधे उपलब्ध होत नाही.. तसेच ते सुरक्षीत खात्री लायक असेल यात देखील शंखा निर्माण होते पण आमदार प्रमोद (राजू दादा) पाटील यांनी ते शक्य केले.
आमदार . प्रमोद (राजूदादा) पाटीलयांच्या मार्गदर्शनाने हेदुटणे गावचे माझी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक . तकदिर दशरथ काळण यांच्या वतीने हेदुटणे गावात आणि परिसरातील सर्व नागरीकांना नुकतेच खात्री दायक कंपनीचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने अगदी घरोघरी जाऊन मोफत वाटप केले.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट केलेल्या 27 गावामध्ये पालिकेने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे या गावाची वेगळी नगरपंचायत किंवा नगरपरिषद स्थापन करावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. ती अद्यापही पूर्ण झाली नाही. पण पालिकेच्या मदतीच्या भरवशावर अवलंबून न राहता हेदुटणे गावचे माझी सरपंच आणि आमदार प्रमोद पाटील यांचे खंदे समर्थक समाजसेवक तकदीर काळण हे कायम या परिसरातील लोकांच्या मदतीला धावून जातात. लॉकडाउन च्या काळात हजारोंच्या संख्येने मजूर, निराधार, गरजू, गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. तर आता सामाजिक जाणीवेतून गाव व परिसरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, कोरोनोच्या प्रादुर्भावापासून ते दूर रहावेत, त्याच्या मध्ये कोरोना कोव्हीड 19 या विषाणू विरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी यासाठी या गोळ्या वाटप करण्यात आल्या. त्यांच्या या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यासाठी सहकार्य म्हनूण . दिलीप पाटील ( मा.सरपंच), हेदूटणे भूषण अनंता महाराज पाटील, . धर्मेंद्र महाराज पाटील, विश्वनाथ महाराज काळण, फुलचंद्र काळण, विजय पाटील, . विजय काळण, चैनू पाटील, . काळूराम काळण, . किशोर भंडारी, सुभाष बेळीलकर . रोहीदास काळण, . शनिदास काळण महेंद्र पाटील व गांवदेवी मित्र मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


No comments:
Post a Comment