आपटी येथील उल्हास नदीत प्रेमीयुगल बुडाले, दोन युगूले नदीवर गेले होते फिरायला!
कल्याण (संजय कांबळे) लाॅकडाऊण असताना ही कल्याण तालुक्यातील आपटी येथील उल्हास नदीत बंधा-याजवळ पाण्यात बुडालेल्या प्रेमीयुगलाचा बुडून मृत्यू झाला असून ही घटना आज दुपारी 4:30वाजता घडली आहे.
सध्या सर्व कोरोनोच्या धसक्याने आप आपल्या घरात बसले आहे. या महामारी चे गांभीर्य ओळखून शासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. सध्या सर्वत्र जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच लाॅकडाऊण लागू केले आहे. अनेक नागरिकांनी स्वतः घरी राहून लाॅकडाऊण चे पालन करित आहेत. तर दुसरीकडे काही महाभाग बिनधास्त मौजमजा करायला बाहेर पडत आहेत. असेच पंजाबी काॅलनी, आणि धोबीघाट उल्हासनगर येथे राहणारे दिपेश वालाजी परमार वय 21,आणि गुंजन सुनील लंभाना वय 18 हे दोघे अजून एका मित्र मैत्रीणी सोबत तालुक्यातील आपटी गावातील उल्हास नदी बंधा-याखाली असलेल्या परशी येथे फिरायला गेले होते. यातील दिपेश हा पाण्यात पडला व बुडू लागला तोच गुंजन हि त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले ही घटना आज दुपारी 4:30 वा घडली गोवेली पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर प्रदीप अरोटे हे सहका-यासह घटनास्थळी पोहोचले व दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. ते ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले.आहेत.
*लाॅकडाऊण असताना रस्त्यावर गर्दी - कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील लाॅकडाऊण 31मे पर्यंत वाढविण्यात आले आहे पण काही भागात शिथिलता देण्यात आली आहे.याचा गैरफायदा घेऊन तसेच कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, शहापूर येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत असे असताना ही कल्याण मुरबाड महामार्गावर अनावश्यक गर्दी दिसत आहे. रायते, येथील उल्हास नदीच्या काठावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशीच परिस्थिती रुदा येथील काळू नदी, खडवली येथील भातसा नदित, दिसून येत आहे. सर्व कामे पोलीसांनी करायला हवे का, आपली काही जबाबदारी नाही का? याचा विचार व्हायला हवा, त्यामुळे आपल्या कडून लाॅकडाऊण चे पालन होते का ते लागू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

No comments:
Post a Comment