Friday, 22 May 2020

1495 पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांची मोफत स्वॅब तपासणी

1495 पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांची मोफत स्वॅब तपासणी



कल्याण : कोरोना साथीच्‍या पार्श्‍वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सुरुवातीच्या कालावधीत कस्‍तुरबा रुग्‍णालय, मुंबई येथे तपासणी करीता जावे लागत असे. महापालिकेतर्फे दि. 01 एप्रिल, 2020 पासून महापालिकेच्‍या तज्ञ डॉक्‍टरांमार्फत रुग्‍णांचे स्वॅब घेऊन ते मुंबई येथील हाफकिन इन्स्टिटयुट या ठिकाणी पाठवून नागरिकांचे विनामुल्‍य रिपोर्ट महापालिकेमार्फत देण्‍यात येत आहेत. महापालिकेने तापाचे दवाखाने सुरु केले आहेत. झोपडपट्टी भागात देखील सर्व्हेक्षण सुरु आहे. तापाच्या दवाखान्यात, तसेच सर्व्हेक्षणात आढळलेले व पॉझिटीव्ह रुग्णांचे जवळचे नातेवाईक यांना टाटा आमंत्रा येथे दाखल करुन घेऊन त्यांचे स्वॅब घेतले जातात व हाफकिन संस्थेकडे पाठवून मोफत टेस्ट केली जाते. ज्या नागरीकांना टाटा आमंत्रा येथे ॲडमिट होऊन टेस्ट करायची नसते व स्वखर्चाने ऐच्छिक खाजगी लॅबमध्ये टेस्ट करावयाची असते अशा नागरीकांसाठी खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्याची सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच पिवळे व केसरी रेशन कार्डधारक यांना मोफत स्वॅबची तपासणी उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीत बाई रुक्मिणीबाई रुग्‍णालय येथे महापालिका क्षेत्रातील ज्‍या नागरिकांना खाजगी लॅबमध्‍ये टेस्‍ट करावयाची आहे, त्‍यांचेकरीता कृष्णा डायग्‍नोस्टिक मार्फत रु. 3000 मध्ये महापालिका क्षेत्रातील नागरीकांना टेस्ट करण्याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे.

आत्तापर्यंत शास्त्रीनगर रुग्णालयात 320 स्वॅब व टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर येथे 1175 स्वॅब असे मिळून 1495 स्वॅब ऐवढया नागरीकांच्या स्वॅबची तपासणी मोफत करण्यात आलेली आहे. तसेच खाजगी लॅबमध्ये 1654 नागरीकांनी ऐच्छिक टेस्ट करुन घेतली आहे.

महापालिकेच्या शास्त्रीनगर व टाटा आंमत्रातील रुग्‍ण तसेच तापाचे दवाखान्‍यातील रुग्‍णांसाठी विनामुल्‍य स्‍वॅब घेण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन दिलेली आहे.

मोठया संख्येने टेस्ट मोफत केल्या असतांना व खाजगी लॅबमध्ये ज्या नागरीकांना स्वखर्चाने टेस्ट करावयाची आहे अशा नागरीकांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असतांनाही काही सुजाण नागरीक महापालिका जास्त दराने टेस्ट करत असल्याबाबत महापालिका क्षेत्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...