शहापुरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना बाबत घेतली आढावा बैठक
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा आज, शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. शहापूर तालुक्यात आजपर्यंत ६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ११ रुग्ण बरे झाले आहेत, तर एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
श्री. शिंदे यांनी शहापूर पंचायत समितीच्या शेतकी हॉल मध्ये बैठक घेतली. यात त्यांनी कोविड १९ बाबत चालू असलेले फिवर क्लिनिक, विलगिकरण कक्ष, तसेच उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, येथील सोयी सुविधा याबाबत माहिती घेतली. तसेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू याबाबत चर्चा केली.
या प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर,खासदार श्री कपिल पाटील, आमदार श्री दौलत दरोडा, माजी आमदार श्री पांडुरंग बरोरा तसेच अधिकारीवर्ग उपस्थित होता.


No comments:
Post a Comment