म्हारळ गावात कोरोनाचा शिरकाव, अखेर ज्याची भिती वाटत होती तेच झाले?
कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या म्हारळ गावात पोलीस शिपाई यांचे माध्यमातून कोरोनाचा शिरकाव झाला असून अखेर ज्याची भिती वाटत होती तेच झाले असल्याने सर्वाचीच धावपळ उडाली आहे. आता तरी लोकांनी शहाणे होऊन घरीच रहावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
कल्याण तालुक्याच्या आजुबाजुला असणाऱ्या शहरात कोरोनाचा आकडा सतत वाढत होता. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आंबिवली, उल्हासनगर, आणि शहापूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कल्याण तालुक्याचा विचार केला तर निळजे आणि खोणी या गावाचा अपवाद वगळला तर कल्याण ग्रामीण भाग कोरोना मुक्त होता. विशेष म्हणजे सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोठ्या लोकसंख्येच्या म्हारळ, वरप आणि कांबा या गावात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता यांचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. पण हे फार काळ टिकवता आले नाही. कारण म्हारळ येथील गावदेवी मंदिर परिसरात राहत असलेल्या आणि ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात शिपाई असलेल्या पोलीस कर्मचारी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव आला आहे. महत्त्वाचे म्हणजे याचा अगोदरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र नंतर त्रास होऊ लागल्याने पुन्हा तपासणी केली असता रिपोर्ट पाॅझिटिव आले. त्यामुळे म्हारळ परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता म्हारळ वरप कांबा या गावातील नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. कारण पावसाळा जवळ येतोय व 31 मे ला कदाचित लाॅकडाऊण उठेल किंवा थोडी शिथिलता येईल. म्हणून आपण सर्वांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करुया व कोरोनाला हरऊया, म्हणजे आपली गावे ख-या अर्थाने कोरोनामुक्त राहतील
No comments:
Post a Comment