Saturday, 23 May 2020

कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी आपल्या प्रभागातील (क्रमांक १६) येथील नागरिकांसाठी केले आरोग्य शिबिराचे आयोजन

कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. महापौर, नगरसेवक यांनी आपल्या प्रभागातील (क्रमांक १६) नागरिकांसाठी केले आरोग्य शिबिराचे आयोजन



सतिश वायचळ, कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर जेंव्हा पासून कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू झाले त्या दिवसापासून आपल्या प्रभागातील नागरिकांची आपल्या परिवारातील सदस्यासारखी काळजी घेत आहेत. 

आपल्या प्रभागातील कोणीही गरजू व गरजवंत नागरिक उपाशी राहू नये म्हणून धान्य वाटप केले, व करत आहेत तसेच आरोग्याची सुध्दा काळजी करत असतात, आपल्या प्रभागातील नागरिक सुरक्षित रहावे यासाठी वेळोवेळी जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी, डॉक्टर आपल्या दारी असे उपक्रम राबविले.


काल परत प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन अनुपम नगर येथील सभागृहात केले. यात ३०० च्या वर कुटुंबातील ७०० च्या वर नागरिकांनी सहभाग घेतला. साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर संजय शुक्ला आणि त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिबिरात प्रथम नागरिकांचे थर्मल टेस्टिंग करून डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम ३० (Arsenic Album 30) या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत करण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या या गोळ्या माझ्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध व्हाव्यात हाच माझा उद्देश आहे असे मा. महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले.


अनुपम नगर येथील C1 इमारत सील करण्यात आली आहे मात्र तेथील रहिवाशांसाठी डॉक्टरांनी गेटवरच संपूर्ण खबरदारी घेत इमारती मधील सर्वांचे टेस्टिंग करून आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप केले. यासाठी मनोज जाधव, ममता जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरावेळी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले. शिवसेना भवानी चौक शाखेचे शाखाप्रमुख सतीश वायचळ, विलास जैन, पोर्णिमा यादव, रामनाथ सांगळे, परशुराम यादव, अभिषेक त्रिपाठी, विजय गोवेकर, शिंदे, मोहन मालवणकर, वांद्रे सर, गोरखनाथ भांगरे सर, गुरुचल, वरठे, पोरे, पृथ्वीराज वेताळ, अभिषेक त्रिपाठी, प्रमोद गायकवाड, सचिन कांबळे, सुर्वे, दिनेश कदम, भावेश अवसरे या सर्वांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...