Saturday, 23 May 2020

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप.


मुंबई दि. 23 - कोरोना सांसर्गिक रोगाविरुद्धचा सामना आपण जिंकणार आहोत. त्यासाठी  मास्क वापरणे; दोन हात दुरीचे शारीरिक अंतर राखणे; सॅनिटायझर वापरणे; हात स्वच्छ धुणे ; गर्दी न करणे हे नियम पाळण्याबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे असून त्यासाठी होमियोपॅथीचे आर्सेनिक अल्बम या औषधी गोळ्या घेणे उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

ना.रामदास आठवले यांच्या हस्ते  बांद्रा येथील सांविधांन निवासस्थानी पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गरजू गरिबांना आज आर्सेनिक अल्बम या गोळ्या  मोफत वाटण्यात आल्या . यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर; खेरवाडी पोलीस स्टेशन चे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पालम;  डॉ प्रफुल्ल लोखंडे; डॉ प्रियंका लोखंडे आदी उपस्थित होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पोलीस कर्मचारी  मोठया प्रमाणात बाधित होत असल्याची  अनेक उदाहरणे  उघडकीस आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज ना.रामदास आठवले यांच्या निवासस्थानी 200 पोलिसांना आर्सेनिक अल्बम औषध आज वाटण्यात आले. तसेच एकूण 1 हजार लोकांना आर्सेनिक औषध वाटण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले. घाटकोपर मधील शांती निकेतन रुग्णालयाचे प्रमुख डॉ प्रफुल्ल लोखंडे आणि सौ डॉ प्रियांका लोखंडे यांनी आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे ना. रामदास आठवले यांच्या हस्ते वाटप करण्यात केले.

No comments:

Post a Comment

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !  आमच्या आयुष्याचं केलं सोनं  देहाचे झिजून केले चंदन... ज्ञानाच्या महासागराला  अ...