Friday 29 May 2020

म्हारळ गावात दुसरा कोरोना रुग्ण, ग्रामस्थांची चिंता वाढली !

म्हारळ गावात दुसरा कोरोना रुग्ण, ग्रामस्थांची चिंता वाढली!


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एम आय डिसी काॅलनीत कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला असून यामुळे म्हारळ गावातील ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा जवळ आल्याने वेळीच या बाबतीत कडक उपाययोजना न केल्यास येथील परिस्थिती भयावह होऊ शकते.
कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावदेवी मंदिर परिसरात एक पोलीस शिपाई कोरोना पाॅझिटिव आढळून आला होता. याच्या माध्यमातून कोरोनाने गावात शिरकाव केला आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल केले तर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोंनटाईन करण्यात आले आहे. या एकाच पेशंट मुळे ग्रामपंचायत हादरून गेली होती. कारण म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत लोकसंख्येची घनता अधिक आहे. येथील लोक सोशलडिस्टींग पाळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सुदैवाने आतापर्यंत येथे कोरोनोचा शिरकाव झाला नव्हता. पण आता तो झाला आहे. यानंतर पुन्हा आज म्हारळ ग्रामपंचायतीचे जवळ असलेल्या एम आय डि सी मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आज यांचा ड्रायव्हर कोरोनाचा पाॅझिटिव आला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीची चिंता वाढली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे त्यामुळे हे वेळीच रोखले नाही तर मात्र भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून नांगरिकानी आता तर शहाणे होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था होईल.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...