Monday, 4 May 2020

अंबरनाथ येथील रिक्षाचालक कुटुंबियांना मदतीचा आणि कर्तव्याचा_हात देत आजपासून मोफत अन्नधान्य_वाटप.

अंबरनाथ येथील रिक्षाचालक कुटुंबियांना #मदतीचा आणि कर्तव्याचा_हात देत आजपासून मोफत अन्नधान्य_वाटप…
अंबरनाथ, प्रतिनिधी,
 गेल्या ४४ दिवसांहून अधिक काळ राज्यात अवलंबलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षा चालवून आपल्या कु़टुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसाय बंद करावा लागल्यामुळे त्यांना देखील अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांना कोणाही समोर हात पसरायला लागू नये यासाठी, शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आणि  खासदार श्रीकांत जी शिंदे त्यांच्या सोबतिने व श्री. प्रकाश पेणकर यांच्या पुढाकाराने रिक्षा चालक बांधवांना मदतीचा आणि कर्तव्याचा हात देत आजपासून  अंबरनाथ मधे रिक्षा चालक कुटुंबियांना मोफत धान्य वाटप   सुरु करण्यात आले आहे.याप्रसंगी
 रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.रामदास पाटील. श्री. संजय फुलोरे, श्री दिलीप पाटील, श्री.नरेश कलाल,श्री. कुमार मुदलियार, आदी मान्यवर उपस्थित होते।
 

No comments:

Post a Comment

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !! मुंबई, दि. ९...