कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या धसक्याने वाढलेल्या लाॅकडाऊण मध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर व नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्यांची जबाबदारी तालुक्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार कल्याण ग्रामीण भागातील अशा लोकांची आरोग्य तपासणी तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत घेण्याचा निर्णय झाला आणि या परिसरात हजारो नागरिकांनी तूफान गर्दी केली अशाही परिस्थितीत महसूल विभाग, वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करुन नोंदणी व तपासणी अंतिम टप्प्यात नेली. त्यामुळे या सर्वांचे कौतुक व्हायलाच पाहिजे.
कोरोनाने जगात हाहाकार उडवला आहे. देशात लाॅकडाऊण लागू करण्यात आला रुग्ण वाढले त्यामुळे लाॅकडाऊण वाढले आज दिड ते दोन महिन्यापासून परराज्यातील मजूर व नागरिक महाराष्ट्रात अडकून पडले. तसेच आपले काही नागरिक इतर राज्यांत अडकले आहेत. त्यामुळे सरकारने या नागरिकांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. व याची सुरुवात कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप आणि कांबा या ग्रामपंचायतीच्या परिसरातून करण्यात आली. म्हारळ येथील गुरु गोविद शाळा, वरप मधील जिल्हा परिषद शाळा आणि कांबा मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू झाली. लगेचच म्हारळ आणि कांबा येथे परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची तूफान गर्दी झाली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा कल्याण संपर्क प्रमुख डि वाय जाधव यांच्या सूचनेनुसार कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण स्वत या तीन गावात उपस्थित राहून ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करित होते.
पहिल्या दिवशी म्हारळ येथे सुमारे 566,परराज्यात नागरिकांना तपासणी करण्यात आली तर वरप येथे 292 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये झारखंड 24,उत्तर प्रदेश 36, बिहार 23, पश्चिम बंगाल 23, कर्नाटक 52, महाराष्ट्र 74, राज्यस्थान3, आणि छत्तीसगढ 2,तर कांबा ग्रामपंचायत हद्दीत 427 लोकाची तपासणी केली असून यामध्ये उतर प्रदेश220, बिहार 82,झारखंड 127 अशी एकूण तिन्ही गावात बाराशे ते पंदराशे नागरिकाची नोंद झाली आहे. आजच्या दिस-या दिवशी देखील सकाळ पासून तूफान गर्दी झाली होती. या तीन गावात 3/4नागरिकांची नोंद होईल असा अंदाज तहसीलदार दीपक आकडे यांनी व्यक्त केला आहे.
तर कांबा येथे तूफान गर्दी असताना येथे तलाठी जनार्दन सुर्यवंशी, सरपंच मंगेश बनकरी, ग्रामविकास अधिकारी ए जे इंगोले, वरिष्ठ लिपिक गुरुनाथ बनकरी, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक, लोकांची गर्दी नियंत्रित ठेऊन सोशलडिस्टींग ची काळजी घेत होते. या सर्व आरोग्य तपासणी कामात गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याने तहसीलदार दीपक आकडे यांनी त्यांचे कौतुक केले आहे तर कोरोनोच्या वाढत्या काळात तीन गावातील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. (फोटो आहेत)
No comments:
Post a Comment