Wednesday, 6 May 2020

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोलम गावाशेजारील परिसर शील, घरोघरी तपासणी, गटविकास अधिकारी ऑफिसमध्ये,? तहसीलदारांची दोन वेळा भेट !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोलम गावाशेजारील परिसर शील, घरोघरी तपासणी, गटविकास अधिकारी आॅफिस मध्ये? तहसीलदारांच्या दोन वेळा भेट!
कल्याण (संजय कांबळे कोरोनोच्या. वेश्विक महामारि पासून आतापर्यंत अलिप्त राहिलेल्या कल्याण ग्रामीण भागातील कोलम गावापासून कोरोनाने ग्रामीण भागात प्रवेश केला असून यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने या परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू केली असून हा भाग पोलीसांनकडून शील करण्यात आला आहे या गावास कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी दोन वेळा भेट देऊन कर्मचारी व पोलीस यांना सूचना व मार्गदर्शन केले तर ग्रामपंचायतीच्या कुंटूब प्रमुख असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप या गावाला भेट दिली नसल्याने ग्रामसेवकास, कर्मचारी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण देशात कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खळबळ उडाली असताना प्रत्येक राज्यात आपापल्या परीने यावर मात करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत मात्र जिल्हायातील ग्रामीण भागाचा विचार केला तर शहापूर, वाशिंद, कसारा आदी काही भागाचा अपवाद वगळता कल्याण ग्रामीण भाग कोरोनोच्या प्रादुर्भाव पासून दूर राहिला होता. परंतू कल्याण तालुक्यातील कोलम गावातील मुंबई महापालिकेचा कर्मचारी कोरोनाचा रुग्ण ठरला व परिसरात खळबळ उडाली आहे आतापर्यंत थोडे फार उसंत घेतलेले आरोग्य अधिकारी तातडीने कामाला लागले.
या मतदारसंघांचे आमदार किसन कथोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण प्रांताधिकारी, नितीन महाजन, तहसीलदार दीपक आकडे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांना फोन करून घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ खामकर, वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक सरिता धोरडे, सरपंच, सदस्य पोलीस  आदीनी कोलम, केळणी, मामणोली हा परिसर शील केला. तसेच घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला असून हायरिस्क मधील लोकांना अंबरनाथ येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे व इतरांना घरीच होमकोरोंटाईंग करण्यात येणार आहे तसेच येथे चार टिम तयार करण्यात आल्या आहेत सुमारे ४५०/५०० लोकांची पाहणी केली जाणार असल्याचे . वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड यांनी सांगितले
तर कल्याण ग्रामीण लागण झालेल्या कोलम गावास परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुरबाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे, तहसीलदार दीपक आकडे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे यांनी भेट दिली व पाहणी केली मात्र कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या गावास भेट देऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवायला हवा होता पण तसे झाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे (फोटो आहेत)

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...