उल्हासनगरात सापडले 129 कोरोना बाधित रुग्ण
नवनियुक्त आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी यांच्यापुढे नवे आव्हान!!
उल्हासनगर, सिध्दांत गाडे - उल्हासनगर मध्ये 23 रोजी जून रोजी सर्वात जास्त 129 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 64 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 791 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.
विशेष म्हणजे उल्हासनगर महानगर पालिकेत नवनियुक्त आयुक्त पदावर डॉ. मतांडा राजा दयानिधी यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली असून सध्याचे पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांची बदली करण्यात आली आहे. परंतु उल्हासनगर महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी यांच्यापुढे नवे आव्हान यांच्यापुढे कोरोना संसर्गाचे नवे आव्हान असून ते या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातात आणि यावर कशा प्रकारे मात करतात हे येणारा काळच सांगेल. याबद्दल शहरवासियांना उत्सुकता लागली आहे.
नवनियुक्त आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी हे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते परंतु शासनाने तातडीने त्यांची नियुक्ती उल्हासनगर महानगर पालिकेत केली असून त्यांना पालिकेचा पदभार स्विकारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात 23 जून रोजी उल्हासनगर शहरात कोरोनाचे 83 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी 483 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून आतापर्यंत 669 कोरोना मुक्त रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तसेच 435 संक्रमीत व्यक्ती कोरोना केअर सेंटर कक्षात दाखल आहेत. 31 रुग्ण कोरोना उपचारार्थिक दाखल आहेत. 17 रुग्ण अती दक्षता विभागात दाखल आहेत. कोरोनाच्या रुग्णांपैकी 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत 669 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
उल्हासनगर शहरातील सरकारी कोरोना केअर सेंटर कक्षात 248 रुग्ण, खाजगी कोरोना केअर सेंटर कक्षात 40 रुग्ण, डी सी एच सी मध्ये 128 रुग्ण, सी सी एच मध्ये 72 रुग्ण, होम आय सोलेशन मध्ये 42 तर उल्हासनगर महानगर पालिकेच्या क्षेत्राबाहेरील 46 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.
25 जून रोजी एकूण 129 कोरोना बाधित झालेले रुग्ण मिळून आले तर 64 व्यक्तींनी कोरोना मुक्त होऊन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत त्यामुळे आतापर्यंत एकूण 791 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.
कॅम्प नंबर 1 मध्ये 18 रुग्ण
कॅम्प नंबर 2 मध्ये 30 रुग्ण
कॅम्प नंबर 3 मध्ये 33 रुग्ण
कॅम्प नंबर 4 मध्ये 27 रुग्ण
कॅम्प नंबर 5 मध्ये 21 रुग्ण
एकूण 129 रुग्ण
उल्हासनगर शहरात आतापर्यंत एकूण 791 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत आणि सध्या एकूण 576 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment