Friday, 26 June 2020

कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, म्हारळ नंतर आता भिसोळ, जांभूळ मध्ये रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन!

कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, म्हारळ नंतर आता भिसोळ, जांभूळ मध्ये रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन!


कल्याण (संजय कांबळे) कोरोनोचा प्रादुर्भाव आता शहराकडून ग्रामीण भागाकडे होत असून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ गावानंतर आसपास च्या गावाकडे तो सरकत असून वरप कांबा यानंतर आता भिसोळ आणि जांभूळ गावात कोरोना ने शिरकाव केला आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सोशलडिस्टींग चे काटेकोर करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कल्याण तालुक्याच्या आजुबाजुला असलेल्या  शहरामध्ये कोरोना कोव्हीड 19 ने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळीकडे भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच तालुक्यातील म्हारळ गावात आतापर्यंत ३० च्या आसपास कोरोना कोव्हीड 19 चे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी त्याच्या परिने प्रयत्न करत आहेत. पण नागरिकांनी ही सहकार्य करायला हवे.
यांनतर वरप आणि कांबा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत पण आता कोरोना याही पुढे सरकला असून भिसोळ येथे एका रुग्ण वाहकाच्या चालकाला कोरोना कोव्हीड ची लागण झाली असून तर त्यांच्या घरातील ५/७ लोकांना घरीच कोरोनटांइग केले आहे.
जांभूळ येथील एकाच घरातील दोघांना प्रथम कोरोना कोव्हीड ची लागण झाली तर नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोना झाला म्हणजे एकूण एकाच घरातील ४जण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत कल्याण तालुक्यातील कोरोनोच्या रुग्णांची संख्या ४०/५० आसपास गेली आहे. यावरुन अजूनतरी तालुका आपल्या आटोक्यात आहे. त्यामुळे सर्वानी वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच सोशलडिस्टींग चे पालन करुन स्वतःच्या कुंटूबासह इतरांची काय घ्यायला हवी असे अवाहन कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...