Monday, 15 June 2020

कल्याण-टिटवाळा, मोहने येथे रिक्षा चालकांचा बेकायदेशीर व्यवसाय पॅसेंजरना लुटीचा प्रकार 2 ऐवजी 5 पॅसेंजर रिक्षात, भाडेही कमालीचे !

कल्याण-टिटवाळा, मोहने येथे रिक्षा चालकांचा बेकायदेशीर व्यवसाय पॅसेंजरना लुटीचा प्रकार
2 ऐवजी 5 पॅसेंजर रिक्षात, भाडेही कमालीचे !


कल्याण (संजय कांबळे) 
लॉक डाऊन च्या काळात रिक्षा चालक मेटाकुटीला आला असताना आता रिक्षाचालक ट्राफिक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातील कार्यरत असणाऱ्याना फाट्यावर मारून आपला रिक्षा व्यवसाय सुरु करीत असून एकाच रिक्षात 5 पॅसेंजर बसवून आपला व्यवसाय बिनधास्त करीत आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंग चा असलेल्या नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र कल्याण-टिटवाळा मोहने येथे आढळून येत आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून लॉक डाऊन मुळे रिक्षाचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने परिसरात कार्यरत असणाऱ्या रिक्षाचालकांना कुठल्याही स्वरूपाची मदत केली नसल्याने रिक्षाचालकांनी आरटीओ, ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या नियमांना फाटा देत अगदी पद्धतशीर प्रवाशांना लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.
गेल्या  दहा दिवसांपासून लॉक डाऊन ला महाराष्ट्र शासनाने सुट् देत रिक्षाचालकाने  दोन पॅसेंजर घेण्याची मुभा दिली होती. मात्र येथील रिक्षाचालक दोन पॅसेंजर ऐवजी एकाच रिक्षाचा पाच जणांना बसून आणि प्रवाशांकडून  ज्यादा पैसे घेऊन अवैध रित्या व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
रिक्षा मध्ये बसायचे तर बसा नाहीतर निघा असं सवाल रिक्षाचालक प्रवाशांना करीत असल्याचे आढळून आले. यावर नियंत्रण कोणाचेच नसल्याचे येथे स्पष्ट होत आहे. यामुळे सोशल डिस्टंसिंग चा कारभार रिक्षाचालकांच्या कार्यपद्धतीमुळे बिघडला आहे. अतिरिक्त ज्यादा भाडेघेऊन रिक्षामध्ये किमान पाच प्रवासी बसवत असल्याने करोना चा प्रदुर्भाव येथे वाढण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण आरटीओ चे प्रमुख संजय ससाने यांना विचारणा केली असता त्यांनी कल्याण ट्रॅफिक पोलिसांना याबाबत कळविले असल्याचे सांगितले. कल्याण वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांना विचारणा केली असता आज कल्याणला सव्वाशे रिक्षाचालकांवर कारवाई करत 27 रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात टिटवाळा पोलिसांशी संपर्क साधला असता नियम बाह्य रिक्षाचालकांवर कारवाई करत असल्याचे सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...