Monday, 15 June 2020

म्हारळ जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरटय़ांचा धुडगूस सामानाची तोडफोड तर काही वस्तू लंपास!

म्हारळ जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरटय़ांचा धुडगूस सामानाची तोडफोड तर काही वस्तू लंपास!



कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या गावात अर्थात म्हारळ मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून वर्गातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे तसेच काही वस्तू लंपास केल्याचे पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे म्हारळ जिप शाळा चोरी ही नित्याची बाब झाल्यामुळे याकडे कोणीही गंभीरपणे लक्ष द्यायला तयार नाही.


उल्हासनगर शहराला लागून असलेल्या या शाळेला ऐके काळी मोठा मान होता. साधारणपणे 1950/55 च्या काळात ही शाळा सुरू झाली असून येथे बोर्ड होते, या शाळेत बोर्डाच्या परीक्षा व्हायच्या, म्हारळ गावांसह शेजारच्या वरप कांबा पावशेपाडा येथील  विद्यार्थ्यां परीक्षा देण्यासाठी या शाळेत यायचे त्यामुळे या शाळेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. पण काळ बदलला, माणसे बदलली व चोरही बदलले वन विभागाच्या जमीनीवर असल्याने या शाळेचा निधी परत गेला होता. केवळ दुरुस्ती वर आतापर्यंत लाखोंचा खर्च करण्यात आला आहे. यातून काही वस्तू खरेदी केली की उदा पंखे, लाऊडस्पीकर मशीन खरेदी केली तर चोरटय़ांनी त्या चोरल्या म्हणून समजा असा काय जणू दंडकच बनला होता.
सध्या या शाळेला 300 च्या आसपास पट संख्या असून 7 शिक्षिका या शाळेत आहेत. शालेय शिक्षण विभागाने काही अटी शर्तीवर शाळा सुरू करण्यात येणार होत्या पण तोपर्यंत चोरांनी शाळेत प्रवेश करून सामानाची तोडफोड केली आहे. खुर्ची, बेंच पत्रे तोडून वह्या पुस्तके इतरत्र फेकून दिल्याचे चित्र वर्गात दिसत होते. तर पत्रा फुटलेला होता.  काही दारु च्या बाटल्या पडलेल्या होत्या. पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रंजना केतन देशमुख यांनी या शाळेची पाहणी केली आहे. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास चोरी होते असे काही शिक्षकांनी सांगितले.(फोटो आहेत)

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...