Thursday, 18 June 2020

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 212 नवे रुग्ण !

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 212 नवे रुग्ण !

एकूण रुग्णसंख्या  2782  तर  68 मृत्यू 
1238 रुग्ण कोरोना मुक्त 
कल्याण : कल्याण डोंबिवली शहर झपाट्याने करोनाच्या विळख्यात गुरफटत असून वेगाने वाढणाऱ्या करोनाचे संक्रमण कमी होण्याची चिन्हे नसून आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने 210 रुग्णांची भर पडल्याने शहरातील रुग्णसंख्या  2782  वर पोचली आहे.
आज आढळलेल्या रुग्णामध्ये टिटवालयातील एक वर्षाच्या चिमुरडीसह दोन 90 वर्षांच्या आजीचा समावेश आहे.
तर आज  60 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने  करोनावर मात करणाऱ्या रुग्णाची संख्या  1238  झाली आहे. तर करोनाशी लढताना डोंबिवली पूर्वेकडील 81 वर्षीय व कल्याण पूर्वेकडील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. यामुळे करोनाने दगावलेल्या रुग्णाची संख्या 68 वर पोचली आहे .तर 1473 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत .दरम्यान लक्षणे नसलेल्या कोरोना पोजिटिव्ह रुग्णांचे बरेच निकटवर्तीयांचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने तसेच लॅब मध्ये प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले .
           

92 वर्षीय आजीची करोनावर मात
डोंबिवली पूर्वेकडील संत नामदेव पथ परिसरात राहणाऱ्या सुमती नार्वेकर या 92 वर्षांच्या आजीबाईंना 8 जून रोजी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डोंबिवलीजवळच्या निऑन हॉस्पिटलमध्ये 9 दिवस उपचार करण्यात आले.  17 जून रोजी त्या करोनातुन  पूर्णपणे बऱ्या झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  रुग्णालयातील डॉकटर आणि कर्मचार्यांनी  करोनाला हरविणार्या आजींना टाळ्याच्या  गजरात निरोप दिला. 

पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालये कोरोनाच्या विळख्यात 
कल्याण डोंबिवली पालिकेच्या  मुख्यालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याना आणि अधिकाऱ्यांना डॉकटरना करोनाची लागण झाल्यानंतर आता प्रभाग क्षेत्र कार्यालय देखील बाधित झाली आहेत पालिकेच्या ई आणि ह प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली असून यातील एकावर उपचार सुरू आहेत तर आता ग आणि ब प्रभाग क्षेत्र कार्यालयातील कर्मचारी देखील करोनाने बाधित झाल्याने ही कार्यालये निर्जंतुकीकरनासाठी बंद करण्यात आली आहेत. दरम्यान करोनाची झपाट्याने लागण होत असल्यामुळे कर्मचारी देखील भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...