Thursday, 18 June 2020

"कोविड 19 च्या अनलॉक पार्श्वभूमीवर' *प्रशासन व नागरिकाची बेफीकीरी* ✍🏻

"कोविड 19 च्या अनलॉक पार्श्वभूमीवर'
*प्रशासन व नागरिकाची बेफीकीरी*  ✍🏻✍🏻


उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरसह कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त झपाट्याने वाढतच आहेत. लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावर होणारी गर्दी, सम विषम दिनक्रम आखून,  नियम मर्यादा ठेवून प्रशासन,  व्यापारी संघटना, आणि ग्राहकांना विचारात घेऊन घेतलेले निर्णय घातक ठरू लागले आहेत. दररोज कोरोना रुग्णाची संख्या भरमसाठ वाढतच आहे. प्रशासनाला नियंत्रण राखणे अपेक्षीत असताना कोणतेही कठोर व कडक नियम पालन होत नसल्याचे दिसत आहे . दारू विक्री हि ऑनलाईन असताना खुलेआम दुकानात काऊंटरवर बिअर विस्की सारखे बिनधास्त लोक खरेदी करताना दिसतात. याबाबत तक्रार केली तर तेवढाच वेळ नाटक करून बंद करणार आणि काही तासांनी पुन्हा सूरू. याला जबाबदार कोण ? 
लॉकडाऊन काळात सगळे घरातच होते. एक रूग्ण जरी आढळून आला तर तो विभाग आणि एरिया पूर्ण प्रतिबंध केला जात होता. आता तर एका सोसायटीत दोन ते चार आढळून येतात पण तो विभाग पूर्णपणे मोकळा ठेवला जातो. कोणतेही फलक, नोटीस वा माहिती प्रशासन देत नाही. नागरीक बेभानपणे वावरतात आणि येणाऱ्या संकटात सापडतात. पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासन कोणत्याच जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत नाही. स्वतःचा बचाव करून कोरोनाग्रस्त व्यक्तीची हेळसांड करण्याचे अमानुष कृत्य घडताना दिसत आहे.
कोविड19 साठी राज्य सरकार अनेक ठिकाणी रुग्णालय व बेडची उपलब्धता करताना दिसत आहे पण त्याच्यात अनेक त्रुटी आहेत. प्रशासन कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. रुग्णालयात खाजगी डॉक्टर अवाजवी फी आकारत नागरिकांना लुटत आहेत. असेच सूरू राहिले तर मृत्यूचा आकडासुध्दा वाढतच राहणार यात शंका नाही.
*अजूनही वेळ गेली नाही. आता आपण आपले रक्षक बनले पाहिजे.नियम व अटी आपल्यासाठी लावून स्वयं कटाक्ष पाळून कोरोनावर विजय मिळवला पाहिजे*
आता आपण आपले रक्षक बना.
स्वतः साठी व परिवाराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप गृपवर सार्वजनिक मेसेज पाठवा.

*मी कोरोनावर मात करणार*
*यासाठी मी गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ जाणार नाही.* *कामाशिवाय घराबाहेर पडणार नाही. माझ्यासमोर कुणी विनामास्क किंवा नियमाच्या विरोधात जात असेल तर त्याला जाणीव करून देईल.*
*हा संदेश मी प्रत्येकात प्रसारीत करेन.* 

जय हिंद ।  जय महाराष्ट्र ॥ ॥ 

*अरुण ठोंबरे*
पत्रकार/संपादक 
9322107521

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...