बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारा माणगांव तहसीलदार यांना साकेत बचाव अंदोलनाचे निवेदन सादर
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) साकेत बचाव, विरासत बचाव अंतर्गत देशव्यापी आंदोलने देशातील सर्व राज्यात जिल्हात , तहसील आणि गाव निहाय सुरू झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि १५ जून रोजी माणगाव तालुक्याच्या माननीय तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात साकेत हीच खरी बुध्द भूमी असून राम मंदिर निर्माण कार्य त्वरित थांबले पाहिजे असे म्हटले आहे.जमीन समतलीरण करण्याच्या कामात त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तथागत बुद्धाचे अवशेष सापडत आहेत. मात्र देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना ब्राह्मणी व्यवस्थेने विवादित राम जन्म भूमीत खोदकाम करून सापडलेल्या अवशेषांची मोठया प्रमाणात नासधूस केली आहे.खरे तर त्या विवादित जागेचे उत्खनन करून भारतीय पुरातत्व विभागाने ती जागा आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. परंतु तसे न होता त्या जागेचे समतलीरण करण्याच्या नावाखाली मोठं मोठे स्तूप उध्वस्त केले गेले. तेथे सापडलेल्या वास्तू सम्राट अशोक कालीन मोठे स्तूप व भिक्कु संघाला अाराम करण्यासाठी बांधलेले संघाराम आहेत. ही सर्व बौद्ध विरासत असून ती तात्काळ बौद्ध लोकांच्या ताब्यात देण्यात यावी. सदर निवेदनात म्हटले आहे. की,आम्ही संविधानिक मार्गाने व लॅाकडाऊनचे सर्व नियम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. हे चरण बद्द आंदोलन असून पुढील टप्पा देशातील सहा लाख खेड्यातील बुद्धविहारात धरणा प्रदर्शन करण्याचा कार्यक्रम योजला आहे.
म्हणून त्या अनुषंगाने दिनांक २२ जून रोजी देशातील सर्व बुद्धविहारात हे आंदोलन केले जाणार आहे.
सदर निवेदन देण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा अध्यक्ष आयु कासे सर, उपाध्यक्ष आयु. विठोबा मोरे, माणगाव तालुका कार्याध्यक्ष आयु.नारायण जाधव सर, बौद्धजन पंचायत समिती २६ गाव चे उपाध्यक्ष आयु.प्रकाश कासे, बामसेफचे तालुका अध्यक्ष मा दीपक मोरे, बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हा प्रभारी राकेश मोरे,मिलिंद साळवी, सुनील गायकवाड,वर्मा शेट,खरवली विभाग अध्यक्ष प्रकाश ओहोळ,भीमराव मोरे, महेंद्र गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment