हिरव्यागार वृक्षानी कल्याण मुरबाड महामार्ग नटला, मन प्रसन्न करणारे वातावरण!
कल्याण (संजय कांबळे) नुकत्याच पडलेल्या पावसामुळे डोंगर, द-या, टेकड्या, माळरान बहरली असून जणू काय धरतीने हिरवागार शालू परिधान केला आहे. यातून जाणारा कल्याण मुरबाड हा महामार्ग दोन्ही बाजूच्या वृक्षानी नटला आहे. यातून प्रवास करने म्हणजे मन प्रसन्न करणारे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या जिकडे तिकडे कोरोनोच्या बातम्या, ती वाढणारी संख्या, गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कोरोना आणि कोरोना यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तीं भयानक घाबरली आहेत., मनाने खचले आहेत. अशा नकारात्मक परिस्थितीत निसर्गाने मात्र या सर्वावर मात केली आहे. कल्याण मुरबाड या पट्टय़ात डोंगर, द-या, ओहळ, छोट्या मोठ्या नाले टेकड्या हिरवेगार झाले आहे कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी रायते, गोवेली, रेवती, बापसई मामणोली, हिंदू सेवा संघ, पोटगाव, घोरला, धानिवली पर्यंत दोन्ही बाजूला हिरव्यागार वृक्षानी दाटी केली आहे. यामुळे येथून प्रवास करणे म्हणजे मनसोक्तपणे निसर्गाचा आंनद घेणे असेच आहे स्वच्छ हवा, मन प्रसन्न करणारे वातावरण, खळ खळ वाहणारे झरे वृक्ष वेली या अतिशय सुंदर चित्र या परिसरातून दृष्टीस पडते यातून जाणारा कल्याण मुरबाड रस्ता एखाद्या हिरव्यागार शेतातून गेलेल्या पायवाटे सारखा भासतो. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात एकदा तरी जायलाच हवे.

No comments:
Post a Comment