Friday, 19 June 2020

गोवेली टिटवाळा रस्ता रखडलेला अनखर पाड्याजवळील पुल अपघातास आमंत्रण!

गोवेली टिटवाळा रस्ता रखडलेला अनखर पाड्याजवळील पुल अपघातास आमंत्रण!


कल्याण (संजय कांबळे) गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला गोवेली टिटवाळा टिटवाळा रस्ता रखडलेला असून अनखरपाड्याजवळील पुल हा अद्यापही अपुर्ण असून ऐन पावसाळ्यात येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेक दिवसांपासून गोवेली टिटवाळा या रस्त्याचे काम सुरू आहे. साईट पट्टय़ासह ग्रामीण रुग्णालय गोवेली च्या पुढील म्हणजे अनखरपाड्याजवळील नाल्यावर पुल बांधायचे काम सुरू आहे. परंतू लाॅकडाऊण मुळे हे काम थांबले होते. त्यातच आता पावसाळा सुरू झाला आहे आणि अशातच साईट पट्यावर डांबरीकरण करण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे हे किती दिवस टिकेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. टिटवाळा पासून ते गोवेली पर्यंत अनेक मो-या आहेत. तेथे खोदून ठेवले आहे. त्याचे काम झाले नाही. तर याच रस्त्यावर अनखपाडा येथे मोठय़ा साकावचे काम सुरू केले आहे. ते अपूर्ण आहे येथे रस्त्यावर चिखल माती रस्त्यावर पसरली आहे. पडणा-या पावसामुळे हा रस्ता निसरडा झाला आहे. रात्री अपरात्री गोवेली कडून टिटवाळ्याकडे किंवा टिटवाळ्याकडून गोवेली कडे येताना किंवा जातांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्यासाठी कित्येक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम गुजरात येथील एका ठेकेदाराने घेतले आहे अशी माहिती समोर येत आहे तर या कामांच्या निकृष्ट दर्जाच्या बाबतीत कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती भारती टेंभे यांचे पती रविंद्र टेंभे यांनी जाब विचारला होता. त्यामुळे याकडे इतर लोकप्रतिनिधी नी मौन का  पत्करले आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...