Friday, 19 June 2020

शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून रुग्णालयास कोरोना रुग्णासाठी एक हजार एनर्जी ड्रिंक सुपूर्द!

शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधून नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून रुग्णालयास कोरोना रुग्णासाठी एक हजार एनर्जी ड्रिंक सुपूर्द!


कल्याण, अभिजित देशमुख : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील आर आर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी आज महेश गायकवाड यांनी एक हजार एनर्जी ड्रिंक रुग्णालय प्रशासनास सुपूर्द केले, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी रुग्णांना ताकद मिळावी म्हणून एनर्जी ड्रिंक चा वाटप करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले .तसेच कल्याण मधील  कोव्हिडं चे रुग्ण असलेल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या एनर्जी ड्रिंक चे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लोकडाऊन काळात गोर गरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगर सेवक व स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी अविरत मदतीचा ओघ सुरू ठेवला गेल्या तीन महिन्यापासून मोफत धान्य वाटप,जेवण वाटप,मास्क सेंटियाझर वाटप,औषधे वाटप अवितरत सुरूच ठेवले असून मुक्या प्राण्याच्या पोटाची खळगी देखील या अवलिया ने भरली .संकट गंभीर तिथे शिवसेना खंबीर हे ब्रीद वाक्य या शिवसैनिकाने तंतोतंत अवलंबले असून अजूनही गरजुना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे .आज रुग्णालयात कोरोनाचा विरोधात लढा देणार्या रुग्णांसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे .

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...