कोरोनाच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाला 36 कोटींचा अतिरिक्त निधी !!
"खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश"
कल्याण - कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आवश्यक ती आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून 10 कोटी रुपयांचा, तर नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून 26कोटी, असा एकूण 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महसूल विभागाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेला 10 कोटी, तर नगरविकास विभागामार्फत ठाणे 4.96 कोटी, उल्हासनगर 7कोटी, कल्याण-डोंबिवली 7 कोटी व अंबरनाथ 7कोटी असा 25.96 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
ठाण्यासह संपूर्ण एमएमआर परिसरात कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपायोजना अमलात आणल्या जात आहे .या भागातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या महापालिका/नगरपालिकांना पुरेसे आर्थिक पाठबळ देण्याची मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार महसूल विभागामार्फत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या मार्फतही निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे करोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल, असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

No comments:
Post a Comment